व्हॉट्सॲपवर नवीन आलेल्या ‘Meta AI’ फीचरचा होणार फायदा

0
146

मेटा चे मेटा एआय हे फीचर आता भारतातही आले असून सध्या ते प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्यात आले आहे. या फीचरचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी करता येतो. यावर्षी एप्रिलमध्ये फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गने मेटा एआय सादर करुन ते कसे काम करेल हे स्पष्ट केले होते. मेटा एआय युजर्स फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि मेसेजवर प्रवेश करु शकतात. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

अनेकांच्या अपडेटेड व्हॉट्सअॅपवर सध्या मेटा एआय नावाचे नवे फीचर दिसत आहे. व्हॉट्सअॅपच्या उजव्या कोपऱ्यात न्यू चॅट ऑप्शनच्या वर निळ्या-जांभळ्या रंगाचं एक वर्तुळ दिसत आहे. ते वर्तुळ म्हणजेच नव्याने लाँन्च झालेले मेटा एआय हे फीचर आहे. या फीचरवर तुम्ही क्लिक केल्यावर चॅटिंगचा ऑप्शन खुला होतो.

एखाद्या व्यक्तीला आपण ज्या पद्धतीने मेसेज करतो, अगदी त्याच पद्धतीने संदेशाच्या माध्यमातून या मेटा एआयला आपण वेगवेगळे प्रश्न विचारायचे. त्यानंतर मेटा एआय आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देते. मेटा एआयला काही विचारायचे असल्यास तुम्ही चॅट्स ऑप्शनमध्ये जाऊन वर सर्च बारमध्ये @MetaAI असं सर्च करू शकता. त्यानंतर लगेच तुम्हाला मेटा एआयशी चॅटिंगच्या मदतीने संवाद साधता येईल.

मेचा एआय थेट ओपन एआयच्या Chat GPT आणि Google च्या Gemini शी स्पर्धा करेल. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही अनेक प्रकारचे प्रश्न विचारु शकता. तसेच, इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत प्रवेश करणे खूप सोपे आहे, ज्याचा दावा कंपनीनेच केला आहे.