व्हिडिओ कॉल केल्याचा जाब विचारल्याने बेदम मारहाण

0
207

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – बहिणीला व्हिडीओ कॉल केल्याने कॉल करणाऱ्यास भावाने जाब विचारला. त्यावरून आठ जणांनी मिळून जाब विचारणाऱ्या भावाला बेदम मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी पहाटे साई चौक, पिंपरी येथे घडली.

प्रतीक जयराज पालवे (वय 31, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल अरनॉल्ड, रोहित वाघमारे, मोनू भोत, शानू भोत, सनी भोत, नितीन कागदा, दिलीप कसबे, रोहन खंडागळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल याने फिर्यादी यांच्या बहिणीला व्हिडीओ कॉल केला. त्यावरून फिर्यादींनी विशाल याला खडसावले. त्याचा राग विशालच्या मनात होता. 13 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजता फिर्यादी साई चौक येथे नाश्ता करत असताना आरोपीने तिथे आले. त्यांनी फिर्यादीस चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या लोकांना आरोपींनी चाकूचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.