व्यावसायीकाला मारहाण करत लुटले

0
242

चिखली, दि. ७ (पीसीबी) – व्यावसायिकाला रस्त्यात अडवून मारहाण करत लुटले, ही घटना साने चौक चिखली येथे शुक्रवारी (दि.6) रात्री घडली.

विष्णू धोंडिराम बिराजदार (वय 32 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चार अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जात असताना दुचाकीवरून आरोपी आले व त्यांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण करत फिर्यादीला झोंबाझोंबी करत खिशातील 5 हजार रुपये काढून घेतले. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.