व्यावसायिकाचे अपहरण करून मागितली 20 कोटी रुपयाची खंडणी

0
297

पिंपरी दि. ९ (पीसीबी) -पुण्यामध्ये एका तरुण व्यावसायिकाचे अपहरण करून 20 कोटी रुपयाची खंडणी मागीतल्याप्रकरणी कुविख्यात गँगस्टर गजा मारणे व त्याच्या गॅंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून या व्यावसायिकाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली.

या घटनेची थोडक्यात माहिती अशी,

  • तक्रारदार यांची शेअर मार्केट व्यवहारांची कंपनी आहे. या कंपनीत हेमंत पाटील यांनी गुंतवणूक केली होती. पण, तक्रारदार यांची कंपनी काही कारणास्तव डबघाईला आली.
  • हेमंत पाटील यांनी जवळपास २० कोटींची गुंतवणूक केलेली होती. त्यातील १६ कोटी तक्रारदार यांनी परत देखील केले होते.
  • उरलेली रक्कम म्हणजेच ४ कोटी राहिले होते. ते पैसे मिळवण्यासाठी पाटील यांनी पप्पू घोलपला सांगितले होते.
  • यानंतर हे पैसे तक्रारदार यांच्याकडून मिळवून देण्यासाठी गजा मारणे व त्यांची गॅंग यामध्ये सहभागी झाली.
  • त्यांनी शुक्रवारी दुपारी या व्यावसायिकाचे कात्रज परिसरातून कारमध्ये अपहरण केले. त्याच्याकडे २० कोटींची खंडणी मागितली.
  • ही बाब खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व त्यांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी अथक प्रयत्न करून या व्यावसायिकाची पप्पू घोलप व गॅंगकडून तक्रारदाराची सुखरूप सुटका केली.

याप्रकरणी एका महिलेसह गजा मारणे, पपू घोलप, हेमंत पाटील, फिरोज तात्या, अमर किरदत्त, रुपेश मारणे व त्यांचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एका ३३ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.