व्यावसायिकाचे अपहरण करुन मारहाण

0
373

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – उसने पेसे दिले नाहित म्हणून पाच जणांनी व्यावसायीकाचे अपहरण करून मारहाण केली आहे. हा प्रकार शांतीनगर भोसरी येथे सोमवारी (दि.९) रात्री घडला.

बिष्माचार्य पांडुरंग मोरे (वय ४४ रा.चिखली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सागर बबन चव्हाण (वय ३५),अनिकेत उत्तम सरवडे (वय २१) व श्रमीक सिद्धार्थ तांबे (वय २२) सर्व राहणार मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक आहेत. सागर चव्हाण याने फिर्यादीला तू उसने घतलेले पैसे परत कधी देतो म्हणत दमदाटी करण्यास सुरुवात केली, तसेच चल गाडीत बस सानपाडा पोलीस ठाण्यात चल, तिथे तू कधी पैसे देणार हे पोलिसांसमोर लिहून दे म्हणत कॉलर पकडून जबरदस्तीने गाडीत बसवले. गाडी मुंबईच्या दिशेने नेत गाडीतील आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली व माझे लवकर पैसे दे नाही तर तुला व तुझ्या मुलाला पोलीस केसमध्ये अडकवू अशी धमकी दिली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.