व्यावसायिकाची 44 लाखांची फसवणूक

0
207

पिंपरी दि. २४ (पीसीबी) -रस्त्याच्या कामाच्या बदल्यात पैसे न देता जागेचा ताबा देण्याचे सांगत व्यावसायिकाची 44 लाख 20 हजार 118 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 12 नोव्हेंबर 2016 रोजी कासारसाई येथे घडली.

कुंदन रामचंद्र काटकर (वय 33, रा. रावेत) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आचल डेव्हलपर्सचे मालक अमित देवराम कलाटे (वय 32, रा. वाकड चौक, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॉटिंग डेव्हलपमेंट मधील रस्त्याच्या कामाच्या बदल्यात अमित कलाटे यांनी फिर्यादी यांना 44 लाख 20 हजार 118 रुपये देणे होते. मात्र पैसे न देता कलाटे यांनी फिर्यादींना कासारसाई येथील साडेसहा गुंठे जागा दाखवली. पैशांच्या मोबदल्यात त्या जागेचा ताबा देण्याचा त्यांचा व्यवहार झाला. मात्र कलाटे यांनी जागेचा ताबा न देता तसेच पैसेही न देता फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.