व्यापारी आणि फेरीवाल्यांच्या समन्वयाने प्रश्न मार्गी लागतील : बाबा कांबळे

0
210

– पिंपरीतील व्यापाऱ्यांच्या समस्येबाबत आयोजित बैठकीत बाबा कांबळे यांनी मांडली भूमिका

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – व्यापाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासह फेरीवाल्यांना देखील अनेक अडचणी निर्माण होत आहेत. व्यापारी आणि फेरीवाल्यांनी समन्वयाने मार्ग काढणे गरजेचे आहे. दोघांनीही चर्चेतून आपले प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यायला हवे. व्यापारी आणि फेरीवाल्यांचा विचार करून पुढील काळात दोघांचेही नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊ असे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले.

पिंपरीत व्यापारांच्या समस्येबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. पिंपरी मर्चंट असोसिएशनने या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, महापालिका अतिरिक्त आयुक्त वाघ साहेब पोलिस उपायुक्त मंचक इप्पर ,आनंद भोईटे, श्री आस्वानी, माजी स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी प्रमुख उपस्थित होते. या वेळी बाबा कांबळे यांनी आपली मते व्यक्त केली.

बाबा कांबळे म्हणाले की, आम्ही व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही. फेरीवाल्यांसाठी हॉकर्सझोन झाले पाहिजे, अशी आमची पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे मागणी आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी नेहमी समन्वयाची भूमिका घेतलेली आहे. ते सर्व व्यापारीसह फेरीवाल्यांना न्याय देतील. काही फेरीवाले भाड्याने दुकान देतात असं मला या ठिकाणी सांगण्यात आलं. फेरीवाल्यांमध्ये असे कोणी माफी तयार होत असेल तर आम्ही अशा माफियांच्या बाजूने नाही म फेरीवाल्यांच्या नावाखाली कोणी दादागिरी करत असेल आणि एकापेक्षा अधिक दुकान सुरु करून व्यापाऱ्यांसोबत भांडण करत असेल तर त्या गोष्टीला आमची संघटना समर्थन करणार नाही. अशा घडना घडल्याच्या काही व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. अशा चुकीच्या गोष्टींना आम्ही समर्थन देणार नाही, हातावर पोट असणारा जो स्वतः व्यवसाय करतो अशा गोरगरिबांच्या बाजूची आमची भूमिका आहे गोरगरिबांच्या बाजूने मात्र आम्ही नेहमी लढत राहू बाबा कांबळे म्हणाले.

व्यापाऱ्यांच्या समस्येबाबत आयोजित या बैठकीमध्ये डब्बू आसवानी यांनी बोलावून फेरीवाल्यांची बाजू ऐकून घेतली. त्यासाठी फेरीवाले देखील सहकार्याची भूमिका घेतील, असेही बाबा कांबळे म्हणाले.