व्यक्तीचे अपहरण करून मागितली 25 लाखांची खंडणी

0
319

चिखली, दि. ९ (पीसीबी) – एका व्यक्तीला बाहेर बोलावून त्याचे अपहरण केले. त्यानंतर व्यक्तीच्या घरच्यांकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच तीन लाख रुपये दिले नाहीतर तर अपहरण केलेल्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण करण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. ५) रात्री दहा वाजता घरकुल चिखली येथे घडली.

दिलीप जाधव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती घरी असता आरोपीने त्यांना फोन करून च-होली फाटा, डुडुळगाव येथे गाडीचे भाडे असल्याचे सांगून त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर तिथून आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला अज्ञात ठिकाणी नेले. ७ जून रोजी फोन करून सुरुवातीला २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यांनतर तडजोड करून तीन लाख रुपयांची मागणी करत तीन लाख रुपये न दिल्यास फिर्यादी यांच्या पतीच्या जीवाला बरे वाईट करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.