वॉशिंग मशीन, फ्रीज विकण्याच्या बहाण्याने 80 हजारांची फसवणूक

0
308

दिघी, दि. १२ (पीसीबी) – ओएलएक्स या संकेतस्थळावर घरातील वस्तू विकण्याची जाहिरात करून दोघांनी मिळून एका तरुणाची 80 हजारांची फसवणूक केली. ही घटना सात आणि आठ ऑगस्ट रोजी गायकवाड नगर, दिघी येथे घडली.

बिपिन केशव प्रसाद सिंह (वय 28, रा. गायकवाड नगर दिघी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 11) दिघी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यानुसार अमित कुमार, शिला देवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित कुमार याने त्याच्या घरातील फ्रीज आणि वॉशिंग मशिन विक्रीसाठी ओएलएक्स या संकेतस्थळावर जाहिरात दिली. ती जाहिरात पाहून फिर्यादी यांनी आरोपीला संपर्क केला. अमित कुमार याने फिर्यादी कडून शीला देवी हिच्या पेटीएम खात्यावर 80 हजार 60 रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादीला वॉशिंग मशीन आणि फ्रीज न देता फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.