वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचा पंढरपूर देवस्थानकडून गौरव

0
411

पंढरपूर, दि. २१ (पीसीबी) – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांचे तर्फे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेचे आयोजन केले होते. संस्थेचे हे काम गेली २९ वर्षे निरंतर पणे चालू आहे. संस्थेच्या अशा लोककल्याणकारी कामाची दखल घेऊन, श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ने संस्थेचा गौरव सोहळा कार्यक्रमात सत्कार देऊन सन्मानित केले.

हा सत्कारविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती चे आदरणीय श्री गजानन गुरव कार्यकारी अधिकारी, श्रीमती शकुंतला नडगिरे, ह.भ.प जळगावकर महाराज प्रमुख अतिथी, मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाढ यांच्या हस्ते करण्यात आला. वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट चे विश्वस्त अशोक आहेर, श्रीराम नलावडे, डॉ. वसंतराव गोरडे, पुणे विभाग प्रमुख मुकेश सोमैय्या व डॉ. निलीमा बांगी यांनी संस्थे तर्फे सत्कार स्वीकारला.