वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेला अटक

0
936

चिखली, दि. २३ (पीसीबी) – एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतल्या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेला सदनिका उपलब्ध करून दिल्याबद्दल सदनिका मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी (दि. 21) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास चिखली प्राधिकरण येथे करण्यात आली.

पोलीस अंमलदार सुनील शिरसाट यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला आणि आर डी लांडगे (वय 40, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने एका पिडीत महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेवर महिलेने आपली उपजीविका भागवली. तर आरोपी लांडगे याने आरोपी महिलेला कोणताही भाडेकरारनामा न करता वेश्या व्यवसायासाठी सदनिका उपलब्ध करून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.