वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

0
332

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) : एक महिला आणि एक अल्पवयीन मुलगी यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) सायंकाळी मुंबई-बेंगलोर महामार्गावर किवळे, रावेत येथे करण्यात आली.

राहुल बाळू दिवार (वय 32, रा. चिंचवड) आणि एक महिला यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संगीता जाधव यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल दिवार हा एजंट आहे. त्याने आरोपी महिलेसोबत मिळून एका महिलेला आणि एका अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवले. त्यातून त्या दोघींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. बेंगलोर-मुंबई महामार्गावर किवळे येथे एका लॉजवर हा प्रकार सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. एक महिला आणि एक अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली. तर दोघांना अटक करण्यात आली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.