वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

0
729

दिघी,दि.०२(पीसीबी) – महिलेला पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 29) रात्री साईनगरी येथील सुमा अगत्य लॉज येथे करण्यात आली.

अजय रमेश रणदिवे (वय 25, रा. वडमुखवाडी), अजय दत्ता हरणे (वय 25, रा. सावरी, ता. निलंगा, लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह संजय पवळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सोमनाथ खडसाळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपींनी आपली उपजीविका भागवली. याप्रकरणी माहिती मिळाली असता पोलिसांनी सुमा अगत्य लॉजवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका करत दोघांना अटक केली. तसेच आठ हजार 940 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.