वेश्या व्यवसाय प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

0
1302

चऱ्होली,दि.१६(पीसीबी) – एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी चऱ्होली फाटा, दिघी येथे केली.

पोलीस अंमलदार गणेश कारोटे यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवले. त्या महिलेकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपींनी आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. पिडीत महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.