वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
602

कुरुळी, दि. १९ (पीसीबी) – वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 17) सायंकाळी बागडेवस्ती कुरुळी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

अजित संजीवन लाल गौतम (वय 21, रा. कुरुळी, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह सुधाकर संजीवा शेट्टी (वय 49, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हॉटेलमध्ये कारवाई करून महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. आरोपी वेश्या व्यवसायातून आलेल्या पैशांवर आपली उपजीविका भागवित होते. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.