वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

0
518

-चार महिलांची सुटका

हिंजवडी, दि. १० (पीसीबी) – ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन दलालांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी कस्तुरी चौक, हिंजवडी येथे करण्यात आली. यामध्ये चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

ऋषिकेश राजाराम पांगारे (वय 24, रा. हिंजवडी. मूळ रा. मुंबई), महिला (वय 32, रा. वारजे माळवाडी, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक भगवंता मुठे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला व्हाट्सअप द्वारे ग्राहकांशी संपर्क साधत असे. व्हाट्सअपवर ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवून त्यातून ग्राहकांनी निवडलेल्या महिलांना ऋषिकेश पांगारे याच्याद्वारे ग्राहकाकडे पाठवत असे. यासाठी आरोपी महिला प्रत्येकी ग्राहकाकडून तीन ते चार हजार रुपये घेत असे. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाकरवी सापळा लावला. त्यानुसार ऋषिकेश चार महिलांना कार मधून घेऊन आला. कस्तुरी चौक, हिंजवडी येथे आरोपी आला असता पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. पुढील चौकशीत त्याच्या साथीदार महिलेचा सहभाग आढळून आल्याने तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. एक कार, रोख रक्कम, मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह असा सहा लाख 12 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक विजय कांबळे, अंमलदार कल्याण महानोर, सुनील शिरसाट, सुधा टोके, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, भगवंता मुठे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली.