वेश्या व्यवसाय प्रकरणी तरुणास अटक

0
697

हिंजवडी, दि. २५ (पीसीबी) – एका महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या तरुणाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 23) रात्री नऊ वाजता विनोदेवस्ती, हिंजवडी येथे करण्यात आली.

प्रतिक विलास अल्हाट (वय 23, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस अंमलदार भगवंता मुठे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. तो फोनवर ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवत असे. ग्राहकांना लॉज अथवा हॉटेल मध्ये रूम बुक करण्यास सांगून ग्राहकांनी पसंत केलेल्या मुलींना तो लॉज अथवा हॉटेलवर पाठवत असे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने बनावट ग्राहकाच्या आधारे हिंजवडी मधील विनोदे वस्ती येथे एका लॉजमध्ये सापळा लावला.

एका तरुणीला घेऊन आरोपी लॉजमध्ये आला असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. आरोपीकडून 12 हजार 30 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.