वेश्या व्यवसाय प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

0
347

पिंपरी दि. ७ (पीसीबी) -एका महिलेकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यावर आपली उपजीविका भागवणा-या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) सायंकाळी सव्वासात वाजता खेड तालुक्यातील सोळू गावात करण्यात आली.

शुभम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), रवींद्र पांडुरंग ठाकूर (वय 35), कैलास सुरेश ठाकूर (वय 32, रा. सोळू, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका महिलेला (वय 33) वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने पैशांचे आमिष दाखवून प्राप्त केले. तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. वेश्या व्यवसायातून दोन हजार 520 रुपये रकमेतून आरोपींनी आपली उपजीविका भागवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.