देहूरोड, दि. ९ (पीसीबी) – वेश्या व्यवसाय प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. ८) दुपारी दीड वाजता देहूगाव-तळवडे रोडवर अभिरुची लॉज येथे करण्यात आली.
राशिद हापीज बेग (वय २३, रा. देहूगाव), लॉज मालक वसंत शेट्टी, राणी काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसंत शेट्टी आणि राणी काळे यांनी एका २२ वर्षीय महिलेला पैशांचे आमिष दाखवले. त्या महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून येणा-या पैशांवर आरोपींनी आपली उपजीविका भागवली. पोलिसांनी लॉजवर छापा मारून १२ हजार ३० रुपयांचा ऐवज जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.












































