वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक

0
467

सोमाटणे, दि. ०८ (पीसीबी) – महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एकास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 6) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारसा सोमाटणे टोल नाक्याजवळ एका लॉजमध्ये करण्यात आली.

राहुल शिवाजी शिंदे (वय 31, रा. धनकवडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश कारोटे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमाटणे टोल नाक्याजवळ एका लॉज मध्ये बुधवारी रात्री छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये सहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. वेश्या व्यवसायातून मिळालेल्या पैशांवर आरोपी राहुल हा आपली उपजीविका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.