वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक

0
664

चाकण, दि. ८ (पीसीबी) – वेश्या व्यवसाय प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई शनिवारी (दि. 6) सायंकाळी सव्वाचार वाजता करण्यात आली.

सचिन मोतीरामजी बोराडे (वय 35, रा. मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मारुती करचुंडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन बोराडे याने त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत त्यातून मिळालेल्या रकमेतून त्याने आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करत सचिन बोराडे याला ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.