वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक

0
283

पिंपळे सौदागर, दि. १९ (पीसीबी) – स्पा सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. त्यात तीन महिलांची सुटका करून एकास केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १८) दुपारी पिंपळे सौदागर येथे करण्यात आली.

अनसराज अण्णाराव माने (वय ३५, रा. पाचपीर चौक, काळेवाडी. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या स्पा सेंटर चालक मालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनील शिरसाट यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील एका सोसायटीमध्ये आरोपी आरोग्य मंथन स्पा नावाने स्पा सेंटर चालवत होता. त्यात त्याने तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यावर आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून कारवाई करत स्पा सेंटर चालक मालकाला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.