वेश्या व्यवसायातून चार महिलांची सुटका

0
926

ताथवडे, दि. ३० (पीसीबी) – पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका व्यक्तीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. त्याच्या ताब्यातून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई ताथवडे येथे करण्यात आली.

भारत आजिनाथ फरांडे (वय 45, रा. कात्रज. मूळ रा. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत चार महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेवर आरोपीने आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई करत चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. यामध्ये पोलिसांनी 14 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.