वेश्याव्यवसाय प्रकरणी एकास अटक

0
367

रावेत, दि. ५ (पीसीबी) – वेश्याव्यवसाय प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका व्यक्तीस अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 3) सायंकाळी रावेत किवळे रोड येथे करण्यात आली.

बाळासाहेब मनोहर डाडर (वय 36, रा. चंदन नगर पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या साथीदार दीपक यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार भगवंता मुठे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवले. त्यातून त्या महिलांकडून आरोपींनी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेवर आरोपींनी आपली उपजीविका भागविली. याबाबत माहिती मिळाली असता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करून बाळासाहेब याला अटक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.