वेळेत बंधकाम पूर्ण न केल्यामुळे बिल्डरवर गुन्हा दाखल

0
239

देहूगाव, दि. ७ (पीसीबी) – देहुगाव येथील बांधकाम साईटवरील फ्लॅट वेळेत पुर्ण न करता ग्राहकांची तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कस्तुरी डेव्हलपर्स यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक 2018 मार्च पासून आज अखेरपर्यंत झाली आहे.

राजेंद्र शशीधर उमदी (वय 22 रा. सोमाटणे फाटा) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून तुषार सत्यविजय हेडा (वय 42 रा. दापोडी), मॅनेजर राहूल माने (रा. पिंपळे गुरव) व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हेडा याची कस्तूरी प्रिमीयम ही देहूगाव येथील चव्हाण नगर येथे सुरु असलेल्या बांधकाम साईटवर फिर्यादी यांनी फ्लॅट बुकींग केले त्यासाठी त्यांनी चेक व एनइएफटी द्वारे 10 लाख 42 हजार 751 रुपये दिले. याप्रमाणे आरोपींनी फ्लॅटची बुकींगसाठी 20 ग्राहकांनी एकूण 2 कोटी 27 लाख 16 हजार 962 रुपये घेतले मात्र आज अखेर पर्यंत बांधकाम पूर्ण न करता वेळेत घराचा ताबा दिला नाही. याबाबत विचारणा केली असता बिल्डरकडून धमकीची भाषा केली जात असल्याचा आरोपी फिर्यादीत केला आहे. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.