वेगवेगळ्या समाज घटकांचा भाऊसाहेबांना पाठिंबा

0
71

मातंग आणि धनगर समाजाने भाऊसाहेबांना साथ देण्याचा निश्चय केला

पिंपरी चिंचवड – दि.११ (पीसीबी) : आतापर्यंत आमच्या समाजाला सर्व पक्षांनी गृहीत धरले आहे. मात्र भाऊसाहेब भोईर हे एकमेव असे नेते आहे की त्यांनी आमच्या समाजाला प्रत्येक वेळी मदत केली असून सहकार्याची भावना ठेवली आहे. असे मत सकल धनगर समाज  व सकल मातंग समाजाने व्यक्त केले. अजंठा नगर येथील संत बाळू मामा मंदीरात नुकतीच सकल धनगर समाज  व सकल मातंग समाजाची बैठक पार पडली. या प्रसंगी चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी धनगर समाज व मातंग समाज बांधव यांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी सदैव कटिबद्द राहणार असल्याचे सांगून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी व मातंग समाजाच्या लोकसंख्येनुसार वर्गवारी  अ. ब. क. ड अशी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे मत भोईर यांनी व्यक्त केले.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी हक्काची जागा मिळवून  देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. याचबरोबर हाफकिन महामंडळाच्या पाच एकर जागेच्या ठरावाचा आर्टी निर्मीतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे विश्वास भाऊसाहेब भोईर यांनी दिला.
यावेळी सकल मातंग व सकल धनगर समाज बांधव यांनी भाऊसाहेब भोईर यांचे स्वागत करून समाधान व्यक्त केले. सकल मातंग व सकल धनगर समाज येथून पुढे
समाज म्हणून भाऊसाहेबांच्या सोबत राहण्याचे आश्वासन दिले.

समाज बांधवांच्या समस्या सोडविण्याच्या उद्देशाने संवाद बैठकीचे आयोजन धनगर समाज बांधव समन्वयक अशोक खरात, गणेश खरात तसेच सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक युवराज दाखले यांनी होते. चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी सर्वतोपरी सहकार्य करून भोईर यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आघाडी मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी सकल मातंग व सकल धनगर समाजाकडून देण्यात आले.

या प्रसंगी बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भिसे, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे , वाहतुक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनिल तांबे, डी. पी खंडाळे, रामदास कांबळे, नंदु कारके, महिला आघाडी प्रदेश सचिव कल्पना मोरे, प्रदेश अध्यक्षा संचिता गोसावी, मोनाली नलावडे, अश्विन जाधव,किशोर केळे, विरोद मोठे भाऊसाहेब हरणावर, मधुकर कोळेकर, विजय देंडे, नाना वारे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.