वेंगसरकर अॅकडमीतील तीन खेळाडूंची 19 वर्षाखालील संघात निवड

0
145

खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्या शुभेच्छा

पिंपरी – महापालिकेच्या थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अकादमीतील तीन खेळाडूंची 19 वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रीकेट संघात निवड झाली. त्यातील खुशी मुल्ला हिच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. तिच्यासोबत आचल अग्रवाल, मयुरी थोरात हिचा संघात समावेश झाला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी या खेळाडूंचा कौतुक करत त्यांना सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

खासदार श्रीरंग बारणे यांनी नगरसेवक असताना दृदरृष्टी ठेवून थेरगावमध्ये क्रीकेट अॅकडमी उभारण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगरसकर यांची मदत घेतली. महापालिकेने थेरगाव येथे व्हेरॉक वेंगसरकर अकादमी सुरु केली. तिथे विविध दर्जेदार सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिल्या. त्याचा खेळाडूंना मोठा लाभ होत आहे. अॅकडमीतील ऋतूराज गायकवाडची आयपीएलमध्ये निवड झाली होती. आता 19 वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रीकेट संघाचे कर्णधारपद अकादमीतील खुशीकडे आले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

खासदार बारणे म्हणाले, अकादमीचा शहरातील खेळाडूंना मोठा फायदा होत आहे. अनेक खेळाडू देश, राज्य पातळीवर शहराचे नाव रोषण करत आहेत. अकादमीतील तिघींची महिला संघत निवड होणे आणि कर्णधारपदही येणे ही शहरासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आचल अग्रवाल या खेळाडूचे मला विशेष कौतुक वाटते. दररोज 60 किलोमीटर प्रवास करून नियमितपणे सरावासाठी उपस्थित राहून मेहनत घेऊन पुढे जात आहे. खूशी मुल्ला हिची कर्णधार म्हणून निवड झाली. या सर्व खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे मी अभिनंदन करतो.