वृद्ध महिलेच्या दोन लाखांच्या बांगड्या पळवल्या

0
418

निगडी, दि. ६ (पीसीबी) – बस मधून उतरत असताना वृद्ध महिलेच्या हातातील दोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 5) दुपारी दीड वाजताच्या सुमारास पीएमपीएल बस स्टॉप निगडी येथे घडली.

सुभाष कलगुडा ठाणे पाटील (वय 61, रा. बेळगाव) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या आई कात्रज ते निगडी असा पीएमपीएल बसने प्रवास करीत होते. निगडी येथे बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या आईच्या हातातील दोन लाख रुपये किमतीच्या चार तोळ्यांच्या दोन बांगड्या चोरून नेल्या. निगडी पोलीस तपास करीत आहेत.