वृद्धाकडून नऊ वर्षाच्या मुलीचे लैंगीक शोषण, आरोपीच्या घरच्यांकडून पीडितेच्या पालकांना मारहाण

0
399

दिघी, दि. २६ जून (पीसीबी) – दिघी येथे शेजारी राहणाऱ्या एका 62वर्षीय वृद्धाने 9 वर्षाच्या मुलीसीगैरवर्तन करत तिचे लैंगित शोषण केल्याचाधक्कादायक प्रकार घडला आहे. गोष्ट येवढ्यावरच थांबली नाही तर उलटपक्षी पीडीत मुलीच्य़ा पालकांना वृद्धाच्या मुलाने शिवीगाळ करत मारहाण केली आहे. हा प्रकार 23 डिसेंबर 2022 ते 23 जून 2023 या कालावधीत घडला आहे.

याप्रकऱणी पीडत मुलीच्या आईने शनिवारी (दि.24) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार झुंबर शेखरे (वय अंदाजे 62) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कामाला बाहेर गेले असता, यांची 9 वर्षाची मुलगीघरा बाहेर खेळत होती. यावेळी आरोपीने त्याच्या नाती करवी पीडित मुलीला अभ्यासाचा बहाणा करत बोलावून घेतले. ती घरी आली असता तिला किचन मध्ये नेत त्याने गैरवर्तन केले. हा सारा प्रकार 23 डिसेंबर 2022 रोजी झाला होता. मुलीने संध्याकाळी पालकांना याबाबत सांगितले. याचा जाब विचारण्यास फिर्यादी व त्यांचे पती गेले असता आरोपीने पाय पकडत माफी मागितली तसेच पोलीस-कचेरी नको म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिली नाही.

मात्र 23 जून 2023रोजी फिर्यादी यांच्या लहान मुलीची वस्तू खाली पडली म्हणून फिर्यादीचे पती व त्यांची लहान मुलही हे खाली गेले असता आरोपीच्या पत्नीने वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादीचा मुलगा संजय शेखर याने फिर्यादीच्या घरात येत फिर्यादीच्या पतीच्या कानाखाली दिली. तसेच आरोपीच्या पत्नीने फिर्यादी यांनाही मारहाण केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.