वूई टुगेदर फाउंडेशनचा निःस्वार्थी उपक्रम

0
45

*विकास अनाथ आश्रम, चिखली येथे संगणक वितरण

चिंचवड, दि. 03 (पीसीबी) : वुई टुगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड या सेवाभावी संस्थेच्या वतीने सोनावणे वस्ती, चिखली येथील विकास अनाथ आश्रम येथील ५५ मुलामुलींना (orphan children) अनेक वर्षापासून कायम निस्वार्थी मदतीचा हात असतो यावेळी आणखी एक वेगळा उपक्रम म्हणून येथिल मुला मुलींना लागणारी आवश्यक अंतर्वस्त्रे आणि संगणक प्रदान करण्याचा कार्यक्रम (दि. १ डिसेंबर) आयोजित करण्यात आला . काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र इंगळे , अनिल पोरे, सीता केंद्रे व जयंत देशमुख, अतुल शेठ यांनी या उपक्रमासाठी मोठा हातभार लावला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. कैलास जोरूले, अस्थिरोग तज्ज्ञ, बिर्ला हॉस्पीटल, डॉ. अमृता सहस्रबुधे – जोरूले उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनाली मन्हास यांनी केले, प्रस्ताविक माऊली हारकळ यांनी केले, संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद यांनी वुई टुगेदर फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.

निस्वार्थी समाजसेवेचा वसा घेतलेल्या
आदर्श शिक्षिका मंगला डोळे -सपकाळे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.
या कार्यक्रमात पाहुणे आणि पदाधिकारी यांचे हस्ते मुलांना आवश्यक कपडे ,फळे, संगणक वितरण करण्यात आले.
वुई टुगेदर फाउंडेशनचे सल्लागार मधुकर बच्चे,अध्यक्ष:सलीम सय्यद, जयंत कुलकर्णी, सरिता जयंत कुलकर्णी,, मैमुना सय्यद, साधना बापट, श्रीनिवास जोशी, विलास गटणे, दिलीप चक्रे, अनिल पोरे,धनराज गवळी,अतुल शहा, रविंद्र इंगळे, रोहित वैद्य, के. रंगाराव, अर्जुन पाटोळे,जी आर चौधरी, क्रांतीकुमार कडुलकर, दिलीप पेटकर, दारासिंग मन्हास, मंगला डोळे – सपकाळे आदी पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित होते.