वीजबिल अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेची 10 लाखांची फसवणूक

0
307

सांगवी, दि. ७ (पीसीबी) -वीजबिल अपडेट करण्याच्या बहाण्याने अनोळखी मोबाईल धारकाने महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 3 ते 5 जुलै या कालावधीत सांगवी येथे घडली.याप्रकरणी 53 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9907496946 या क्रमांकावरून बोलणा-या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करून एमएसईबीचे पेमेंट अपडेट करायचे आहे, असे भासवले. फिर्यादी यांच्या मोबाईल मध्ये क्विक सपोर्ट आणि एनी डेस्क ही दोन अप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितली. त्यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करून इंटरनेटचा वापर करून फिर्यादी यांच्या बँक खात्यातून नकळत 10 लाख 30 हजार 920 रुपये वेगवेगळ्या खात्यावर वळती करून घेतली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.