विश्वासाने नेलेली कार परत दिलीच नाही

0
162

१९ जुलै (पीसीबी)चाकण,
चुलत भावाने विश्वासाने कार नेली. ती परत दिलीच नाही. याप्रकरणी चुलत भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 जून रोजी सायंकाळी चाकण येथे घडली.

मयूर किरण बेदरकर (वय 36, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम नितीन बेदरकर (वय 28, रा. कोंढवा, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर यांचा चुलत भाऊ शुभम याने त्यांची साडेतीन लाख रुपये किमतीची कार विश्वासाने नेली. कार दोन दिवसात परत आणून देण्याचे त्याने अशासन दिले होते. मात्र ती कार परत आणून न देता मयूर यांचा विश्वासघात केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.