विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा…

0
297

– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे उध्दव ठाकरे यांना सडेतोड उत्तर

नागपूर, दि. २२ (पीसीबी) – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपावर सडकून टीका केली. यावेळी भाजपाने पक्षात केवळ उपरे भरून ठेवले आहेत की आता तुमचे बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटची मालिका शेअर करत उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे. ‘तयार राहा. अमित शहा भाईंवर टीका करण्यापूर्वी उद्धवराव आधी स्वतःला सांभाळा. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा.’ अशा शब्दात प्रत्युत्तर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.तसेच, गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे. उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही.

भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू. अशा शब्दात इशारादेखील बावनकुळेंनी ठाकरेंना दिला.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
“आज वशंवादावरून माझ्यावर टीका होत आहे. माझ्या घराण्यावर टीका होते आहे. मात्र, मला माझ्या वंशाचा अभिमान आहे. माझ्या घरण्याचा मला अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समिती फोडणारे हे जनसंघ होते. मात्र, तुमच्या वंशावरूनच वाद आहेत. भाजपाने पक्षात केवळ उपरे भरून ठेवले आहेत की आता तुमचे बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.