विश्वशांती विद्यापीठाचा “समर्पित जीवन गौरव पुरस्कार” गुरुवर्य ह.भ.प. विद्यावाचस्पती रविदास महाराज शिरसाठ यांना जाहीर

0
95

आळंदी, दि. ०२ (पीसीबी) : विश्वशांती विद्यापीठाचा “समर्पित जीवन गौरव पुरस्कार” गुरुवर्य ह.भ.प. विद्यावाचस्पती रविदास महाराज शिरसाठ यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. या पुरस्काराने आळंदीचे वैभवात वाढ झाली आहे.

भागवत धर्म वाढविण्याचे एक महान असे मानव कल्याणाचे पुण्यात्मक धर्मकार्य केल्याबद्दल गुरुवर्य ह.भ.प. विद्यावाचस्पती रविदासजी महाराज शिरसाठ यांना माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ पुणे व श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने देण्यात येणारा समर्पित जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीच्या वतीने नुकतेच या आशयाचे पत्र गुरुवर्य बाबांना देण्यात आले आहे.

या पत्रात निवड समितीने गुरुवर्य बाबांच्या वारकरी सांप्रदायातील कार्याबद्दल म्हंटले आहे की, वारकरी सांप्रदायाची वैभवशाली परंपरा आपण लहान वयापासून जोपासली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व भारतीय तत्वज्ञानाला अनुसरून आपण जीवनभर आपले कार्य अत्यंत निष्ठेने व श्रद्धेने जोपासले आहे. आशा शब्दात गुरुवर्य बाबांच्या कार्याचा निवड समितीने गौरव केला आहे.
गुरुवारी ( दि. ३ ) सायंकाळी सहा वाजता विश्वराजबाग, पुणे येथे या पुरस्काराने गुरुवर्य बाबांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास जगभरातील विविध धर्माचे प्रमुख, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, विचारवंत उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराबद्दल गुरुवर्य बाबांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरानसह आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी अभिनंदन केले आहे.