विशाल वाकडकर यांच्या आवाहनास गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद•पर्यावरण पूरक गणेश विसर्जन हौदातून ३२०० मूर्तींचे संकलन

0
13

वाकड दि. १९
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी केलेल्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाच्या आवाहनाला गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला असून. त्यांनी उभारलेल्या पर्यावरण पूरक विसर्जन घाटातून जवळपास ३२०० मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे.

पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन व्हावे, जल प्रदूषण रोखले जावे आणि गणेश मूर्तीची विटंबना रोखली जावी या मुख्य उद्देशाने श्री विशाल वाकडकर यांनी वाकड येथील द्रौपदा मंगल कार्यालयाजवळ पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन घाटाची निर्मिती केली होती. मागील सहा वर्षांपासून ते सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत. या वर्षी गणेशोत्सवात दहा दिवसांत जवळपास तीन हजार दोनशे मूर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले आहे. येथील मूर्तींचे श्री फाउंडेशन पुणे या संस्थेमार्फत संकलन करून मूर्तींची रंगरंगोटी करून दरवर्षी गणपती दान ही योजना राबविली जाते व यातून येणारा निधी हा विविध भागातील अनाथ मुलांच्या संगोपनासाठी तसेच शैक्षणिक खर्चासाठी, आरोग्यासाठी वापरला जातो.

पिंपरी चिंचवड शहर आणि वाकड परिसरातील गणेश भक्तांनी या विसर्जन घाटामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. या ठिकाणी गणेश भक्तांसाठी अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आरती साठी स्वतंत्र कक्ष, निर्माल्य कलश, वाहनतळ, प्रकाश व्यवस्था आदी करण्यात आले होते.

आगामी काळातही पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांना जागरूक करून पर्यावरण पूरक सण साजरे करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल असेही विशाल वाकडकर यांनी सांगितले.