‘विवेकानंदांचे १८९७ चे संकल्प राष्ट्रपित्याने देशाप्रती समर्पित भावनेने व कृतीने साकार केल्यानेच् १९४७ मघ्ये स्वतंत्र भारता’चा ऊदय..!

0
107

महात्मा गांधींच्या ‘जनकल्याण – कारी राज्य व्यवस्थेचा व योगदानाचा’ मोदींना हेतू पुरस्पर विसर पडलाय का..?
काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे दि ३ जून
देशभरातील प्रचार यात्रेत.. भारत परीक्रमेत.. वर्तमान प्रधानमंत्री मोदीजींना, कुठेही गत् १० वर्षातील रिफॅार्म, परफॅार्म व ट्रान्सफॅार्म बाबत आढावा घेऊन जनतेस ऊत्तरदायीत्वाच्या भावनेने काही सांगणे आवश्यक वाटले नाही..!
तसेच “गत १० वर्षातील आपण साधलेल्या Speed (वेग), Scale (श्रेणी), Scope (व्याप्ती), आणि Standard (मानके) इ विषयी देखील आपली उपलब्धी वा प्रयत्न सांगू शकले नाहीत.. हे देशाचेच् दुर्दैव समजावे काय..? असा उपरोधिक सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला..!
ते पुढे म्हणाले की, ईश्वरी शक्ती पुढे मनुष्य अखेर सरते शेवटी शरण जातो.. व त्यास ध्यान धारणेतुन आपल्याला गत काळातील अक्षम्य चुका, कालपव्यय व देश विरोधी चुकीचे निर्णय देखील ऊमजू शकतात.. मात्र तो पर्यंत काळ – वेळ निघून गेलेली असते..!!
‘स्वामी विवेकानंदांचे १८९७ चे संकल्प मोदीजींना आठवतात ही अत्यंत चांगली व देश हिताची बाब आहे मात्र तेच संकल्प राष्ट्रपित्याने देशाप्रती प्रत्यक्ष समर्पित भावनेने साकार केल्याने, ब्रिटिश विरोधी संघर्ष तीव्र केल्याने, सत्याग्रही आंदोलन राष्ट्राप्रती समर्पित भावनेने यज्ञात परीवर्तीत केल्याने व स्वातंत्र्य सेनानींच्या शहीदत्वाची आहुती देऊन, स्वातंत्र्याच्या जननायकास काँग्रेस पक्ष व नेत्यांनी सक्रीय समर्पित साथ दिल्यामुळेच १९४७ साली भारतास स्वातंत्र्य प्राप्ती झाली.. याचे ऊचीत श्रेय वर्तमान प्रधानमंत्री मोदी साहेब महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यास देतील काय..?
‘जनकल्याणकारी राज्य व्यवस्थेचा व बापुंच्या योगदानाचा’ मोदींना विसर पडू नये हीच त्यांच्या कन्याकुमारी येथील ध्यान धारणे नंतरच्या सर्व प्रिंट माध्यमे पुरस्कृत आत्म साक्षात्कारावर’ स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान प्रेमी काँग्रेसजन म्हणु प्रतिक्रिया.. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निवेदनात म्हंटले आहे..!!