विवाह सोहळ्यातून फोटोग्राफरचा कॅमेरा पळवला

0
335

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी येथे एका विवाह सोहळ्यातून फोटोग्राफी करण्यासाठी आलेल्या फोटोग्राफरचा कॅमेरा चोरट्याने पळवून नेला. ही घटना 28 जानेवारी रोजी सिंध नवजवान सेवा मंडळ येथे घडली.

सुशांत दिलीप गायकवाड (वय 23, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांनी 28 जानेवारी रोजी सिंध नवजवान सेवा मंडळ येथे होणाऱ्या विवाह समारंभाची फोटोग्राफीची ऑर्डर घेतली होती. ते फोटोग्राफी करण्यासाठी कामावर गेले असता दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वरपक्षाच्या रूममध्ये त्यांनी त्यांचा 60 हजार रुपये किमतीचा कॅमेरा चार्जिंगला लावला. चोरट्याने चार्जिंगला लावलेला कॅमेरा काढून चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.