विवाहितेने ४ वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

0
29

छत्रपती संभाजीनगर, दि. २9 (पीसीबी): कुटुंबात झालेल्या वादानंतर रागाच्या भरात २९ वर्षीय विवाहितेने ४ वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार दिनांक 28 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील वरखेड शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
सरिता राहुल उबाळे वय २९,अर्पिता राहुल उबाळे वय ४ रा. गट क्रमांक 24 वरखेड शिवार अशी मृतांची नाव आहे. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, उबाळे कुटुंबीय वरखेड शिवारात राहते दरम्यान शनिवार दि. 28 रोजी सकाळी घरगुती कारणावरून कुटुंबामध्ये सरिता यांचा वाद झाला. सरिता रागाच्या भरत घरातून निघून गेली. बराच वेळ झाला ती घरी परतलीच नाही कुटुंबीयांनी शोध घेऊ नये तिचा पत्ता लागला नाही. गावातील गट क्रमांक 24 मध्ये कारभारी उबाळे यांच्या विहिरीत सरिता व अर्पिताचा मृतदेह तरंगताना आढळून आला. दरम्यान त्यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून गंगापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.