विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघांवर गुन्हा

0
368

मोशी, दि. २८ (पीसीबी) – शारीरिक व मानसिक छळ करून क्रूर वागणूक देत सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2009 पासून 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत मोशी येथे घडला.

याप्रकरणी 37 वर्षीय पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती मयूर भाऊसाहेब लंकेश्वर (वय 38, रा. बाणेर), सासू (वय 60), सासरे भाऊसाहेब भगवान लंकेश्वर (वय 65), नणंद (वय 41) तिघे रा. विजापूर रोड, सोलापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस वेळोवेळी टोमणे मारून किरकोळ कारणावरून त्रास दिला. विवाहितेला शिवीगाळ, मारहाण केली. धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ करत क्रूर वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.