विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

0
355

पिंपरी दि. २९ (पीसीबी) -दारू पिऊन पत्नीला मारहाण करणा-या पती आणि पती-पत्नीमध्ये भांडण लावणा-या दोन नणंदांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहार. हा प्रकार 10 मे 2021 ते 22 जून 2022 या कालावधीत मलाड मुंबई येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव भानुदास काटे (वय 31, रा. मालाड पश्चिम मुंबई) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांचा पती हा दारू पिऊन रोज मारहाण करत होता, तसेच पतीच्या बहिणी पतीचे कान भरून पती-पत्नीमध्ये भांडण लावत. फिर्यादींच्या आई-वडिलांबद्दल वाईट बोलत असत. रावेत पोलीस तपास करीत आहेत.