विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघांवर गुन्हा

0
504

पिंपरी दि. १९ (पीसीबी) – माहेरहून १० लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला असल्याची तक्रार विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हडपसर येथे विवाहितेच्या सासरी घडला.
पती सतपालसिंग चंदनसिंग टाक, सासू, सासरे चंदनसिंग कारकूनसिंग टाक, आजे सासरे कारकूनसिंग टाक (सर्व रा. हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी फिर्यादी वाहितेकडे माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. ‘जोपर्यंत तू पैसे आणत नाही, तोपर्यंत घरी यायचे नाही. लग्नात माझ्या मुलाच्या अंगावर एकही दागिना घातलेला नाही. लग्नात आमचा चांगला मानपान केला नाही. तुला चांगले जेवण करता येत नाही’ असे म्हणत विवाहितेला उपाशी ठेवले. ‘तुझ्या आईवडिलांनी फक्त दोन लाख रुपयांचे दागिने तुझ्या अंगावर घातले. परंतु पैसे दिले नाही. तेंव्हा तुला या घरात त्रास होणारच. यापुढे तुला नोकराप्रमाणेच राहावे लागेल’ असे म्हणून फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.