विवाहितेचा लैंगिक छळ करत 50 लाख रुपयांची मागणी

0
399

पिंपरी दि. २४ (पीसीबी) -पती आणि दिराने विवाहितेचा लैंगिक छळ केला. तसेच माहेरहून हुंड्याचे 50 लाख रुपये आणण्याची मागणी केली. हा प्रकार 29 सप्टेंबर 2019 ते 23 जुलै 2022 या कालावधीत मुंबई आणि चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी पतीसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याने त्याची तक्रार मोठ्या दिराकडे करण्यासाठी विवाहिता गेली असता दिराने देखील विवाहितेचा लैंगिक छळ करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घडल्या प्रकाराबाबत कोणास काही न सांगण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेला धमकावले. हुंड्याचे 50 लाख रुपये माहेरहून आणावे यासाठी टोमणे मारून मानसिक त्रास दिला. संसार करायचा असेल तर माहेरहून 50 लाख रुपये आणावे लागतील. नाहीतर दुबईला एक महिना राहावे लागेल. तसेच अश्लील शब्दात बोलून विवाहितेला शिवीगाळ आणि धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.