विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जनता दरबार

0
153

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जनता दरबार घेतला. या दरबारात नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि त्यावर दानवे यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून जाब विचारला. प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

पिंपरी-चिंचवड ठाकरे गटाच्या वतीने जनता दरबार आयोजित केला होता. आकुर्डीतील खंडोबा मंदिर सभामंडप पार पडलेल्या जनता दरबाराला पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, गोविंद घोळवे, मावळ संघटक संजोग वाघेरे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे उपस्थित होते.

शासकीय योजनांचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी, महापालिका प्रशासन दाद देत नाहीत. रेडझोनची मोजणी करावी. रावेत येथील निवासी शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या प्रश्नांकडे नागरिकांनी लक्ष वेधले. वाल्हेकरवाडी परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होत आहे. एक दिवसाआड पाणी येत असल्याने पाणी साठवण करावी लागते. त्यामुळे शहरात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांनी तक्रार करताच विरोधी पक्षनेते दानवे संबंधित अधिकाऱ्याला फोन लावत असल्याचे दिसले. संबंधित प्रश्न सोडविण्याचा आदेश त्यांनी दिला. यामध्ये महापालिकेशी संबंधित अधिक प्रश्न आहेत. यासंदर्भात दुपारी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.

शहरातील सर्वात मोठा म्हणजे २,५०० कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा, सुशोभिकऱणासाठी ५५० कोटींचे कर्ज, प्रशासकीय काळात वाढलेला भ्रष्टाचार आदी मुद्यांवर दानवे स्वतः आयुक्तांना जाब विचारणार आहेत.