विराट कोहली क्रिकेट विश्वातलं गाजलेलं नाव !

0
469

क्रिडा,दि.०५(पीसीबी) – विराट कोहली, विराट हा भारतीय क्रिकेट संघा चा एक दिग्गज खेळाडू आहे भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वात एक वेगळी छाप विराटने सोडलेली आहे. आज विराट कोहलीचा वाढदिवस आहे जाणून तर घेऊयात विराट बद्दल.

विराटला भारतीय क्रिकेटचा पाठीचा कणा म्हणून संबोधले जाते. विराट हा Right handed बॅट्समन आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावशाली असणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. सध्याच्या काळात विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून तो युवा पिढीला स्टाईल आयकॉन देखील आहे.भारतीय क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू विराट कोहली याचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील म्हणजे प्रेमजी कोहली हे एक क्रिमिनल ऍडव्होकेट होते तर त्यांच्या आई सरोज प्रेमजी कोहली या साधारण गृहिणी होत्या. याशिवाय विराट कोहली याचा मोठा भाऊ विकास आणि एक मोठी बहीण भावना देखील आहे.जेव्हा विराट कोहली फक्त तीन वर्षांचा होता तेव्हा त्यांच्या खेळण्यांमध्ये क्रिकेटची बॅट देखील होती.

जसे जसे विराटचे वय वाढत गेले तस तसे त्याची क्रिकेटमधील आवड ही समोर येत गेली.विराटच्या वडिलांनी सुरुवातीलाच विराटची क्रिकेटमधील आवड ओळखली होती. त्यामुळे ते विराटला दररोज क्रिकेट ट्रेनिंगसाठी घेऊन जात विराट कोहली दिल्लीत असताना क्रिकेट, हे राज कुमार शर्मा यांनी शिकवले तर सुमित डोंगरा नावाच्या एका अकॅडमी मध्ये त्यांनी पहिली मॅच खेळली.विराट कोहली हा Right handed Batsman आहे. त्याने 2002 या वर्षी अंडर-15 स्पर्धा खेळलेली आहे. त्यानंतर 2006 या वर्षी विराटची निवड ही अंडर 17 संघासाठी झाली. त्यानंतरच्या काळात त्यांच्या खेळण्याच्या शैलीत खूप सारे बदल बघायला मिळाले.

पुढे 2008 साली त्याची निवड अंडर 19 प्रतियोगीतेसाठी देखील करण्यात आली.विराट कोहली यांनी अंडर 19 मध्ये मलेशिया विरुद्धच्या सामन्यात भारताला विजय प्राप्त करून दिला होता. त्यानंतर विराटची निवड ही वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी झाली. विराटने ही मॅच श्रीलंका संघविरोधी खेळली होती. त्यानंतर त्यांना 2011 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली व भारताने हा विश्वचषक जिंकला.त्यानंतर विराट एकापाठोपाठ एक सामने खेळत गे ला व त्यांची गणना ही सगळ्यात चांगल्या बॅट्समन मध्ये केली जाऊ लागली. सध्याच्या काळात तो क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत.प्रतिदावे सुरू झाले आहेत.