विराज परदेशी शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी

0
113

पुणे दि. ४ (पीसीबी) : महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा *शिवछत्रपती पुरस्काराची नुकतीच घोषणा केली यात मॉडर्न पॅटथलॉन या क्रीडा प्रकारासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू
पुणे ( धायरी ) येथील रहिवासी विराज मिलनकुमार परदेशी
याची शिवछत्रपती राज्य पुरस्कारा करिता निवड झाली .
त्यांमुळे विविध क्षेत्रातून विराज वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
विराज याने वयाच्या ६ व्या वर्षा पासून पुण्यातील टिळक तलाववर पोहोण्याचा सराव सुरु करीत अनेक राज्यस्तरीय पदके प्राप्त करीत राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रा कडून सहभाग घेतला .
त्यावेळी फिटनेससाठी त्यांचे वडील ( राष्ट्रीय कुस्तीगिर ) मिलन परदेशी यांनी धावणे , पोहणे , व साइकलिंग याचा सराव करून घेतला . त्यातूनच ट्रायथलान या खेळा कडे विराज आकर्षित झाला .
यात दीड किलोमीटर स्वीमिंग , ४० किलोमीटर साइकलिंग व १० किलोमीटर रनिंग यचा समावेश होता . एकाश वेळी या तिन्ही प्रकारातून सहभाग घेत विराज ने इंदौर येथे राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले .
त्यातूनच मॉडर्न पॅटथलॉन या खेळाची सुरुवात झाली .
या क्रीडाप्रकारात एकाच वेळी स्वीमिंग , तलवारबाजी , अश्वारोहण , पिस्तौल शूटिंग , व रनिंग अशा पाच प्रकारात आपले कसब पणाला लावून कौशल्य दाखविले १९०५ पाच पासून हा अवघड क्रीड़ा प्रकार ऑलंपिक मध्ये समाविष्ट आहे .
या क्रीड़ा प्रकारात विराज याने तीन वेळा राष्ट्रीय सुवर्ण पदक पटकाविले व भारतीय संघा कडून एशियन बीच खेळासाठी फुकेला येथे निवड झाली .
तर ज्युनिअर स्पर्धेत दुबई येथे ब्रान्झ पदक पटकावून
बीजिंग (चीन ) व बेलासूर येथे भारताचे प्रतिनिधित्व केले . तर किर्गीस्तान येथील स्पर्धेत ब्रान्झ हस्तगत केल्या नंतर इजिप्त येथे वर्ल्ड कप स्पर्धेत ११८ व्या क्रमांकाचे रैकिंग प्राप्त करणारे भारताचे पाहिले क्रीडापटु होण्याचा बहुमान प्राप्त केला .
मॉडर्न पॅटथलॉन या क्रीडा प्रकारासाठी विराज याने हरियाणा येथील करनॉल , तसेच विदेशातील बैंकॉक , इजिप्त , हंगेरी या देश विदेशात सराव केला .
विराज याचे पणजोबा गणपतसिंह परदेशी स्वातंत्र्य सेनानी होते तर चुलत आजोबा मल्ल महर्षि पै . प्रतापसिंह भारतातील मोठे मल्ल होते . व आजोबा वसंतसिह १९७४ चे उपमहाराष्ट्र केसरी होते .
त्यांचीच देदीप्यमान परंपरा आज विराज ने सुरु ठेवली असून , त्यास नामदेवराव शिरगावकर , विट्ठलराव शिरगावकर , शेखर खासनिस , पुनीत बालन , गुणेश पुरंदरे , रणजीत चामले , प्रभिर रॉय , सौरभ देशपांडे , तमन पाणिग्रहण , डॉ . अजित मापरी , हर्षद इनामदार , संतोष पवार , भास्कर भोसले , विनय मराठे यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले .
विराज यास विचारले असता त्याने हा शिवछत्रपती पुरस्कार आपल्य्या आई- वडिलांना व कुटुबियांना अर्पण करीत असल्याची भावनां व्यक्त केली .
शब्दांकन
प्रकाश परदेशी ( आकुर्डि )
9272189242