विमान अपघात कसा झाला, प्रत्यक्षदर्शीने दिली माहिती ?

0
3

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य सहाजण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. पहिल्यांदा विमान वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, तिथल भीषण दृश्य आजूबाजूच्या गावकऱ्यांनी पाहिलं. त्यांनीच मदतीला धाव घेत आग विझवण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिथलं भाषण दृश्य, आजूबाजूला पडलेले विमानाचे अवशेष मृतदेह हे दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला. घटनास्थळी नेमकं काय झालं, विमान अपघात कसा घडला याचा संपूर्ण आंखोदेखा हाल प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला आहे.आज सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान हा दुर्दैवी अपघात झाला.

पहिल्यांदा ते विमान आलं होतं, नीट गेलं मात्र नंतर ते फिरून आलं. गावाकडून आल्यावर ते विमान खूप खालून, खालच्या दिशेहून गेलं मात्र धावपट्टी वरच्या दिशेने होती, पण ते खाली आल्यामुळे पुन्हा वरच्या दिशेने जाऊ शकलं नाही. खाली धावपट्टीच्या इथे ते क्रॉस झालं आणि अचानक पलटी झालं.धडकून त्याबरोबर एकदम विमानाचा स्फोट झाला. तेव्हा आम्ही तिथे जवळच होतं. स्फोट झाल्यावर तो प्रचंड आवाज ऐकून आम्ही हादरलो , खूप घाबरलो होतो. घराच्या पाठीमागे त्या विमानाचे सगळे पार्ट्स पडलेले होते.अपघात झाल्याचं कळल्यावर आम्ही लगेच अधिकाऱ्यांना वगैरे फोन करून माहिती दिली, विमानतळाच्या जवळ अधिकारी, पोलिस वगैरे आले. पण एवढा मोठा स्फोटो झाला होता, आग लागली होती की कोणीच काहीच करू शकत नव्हतं. अग्निशमन दलाचे जवान तिकडे आले. त्यांनी पाणी टाकून आग वगैरे विझवली. त्यांनी, पोलिसांनी आम्हाला पाणी आणायला सांगितलं, बादली बादली भरून आम्हीच तिथे पाणी घेऊन आलो, ते टाकलं. बराच वेळ तिथे स्फोट होत होते, आग धगधगत होती, विझतच नव्हती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी महिलेने दिली.

अजित दादांचा अपघात झाला त्या विमानात कोण कोण होते?

१. अजित पवार
२.विदीप जाधव
३. पिंकी माळी
४. कॅप्टन सुमित कपूर
५.कॅप्टन शांभवी पाठक