विमानसेवा पूर्ण ठप्प, मुंबई विमानतळावर प्रवाशांसाठी मोठी घोषणा

0
54

मुंबई, 20 जुलै (पीसीबी) – मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. काही उड्डाणे रद्द करावी लागली तर काही उड्डाणे उशीरा झाली आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Azure क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या आल्या आहेत. तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.आमच्या सेवा अजूनही ठप्प आहे. दुरुस्तीचं काम सुरु आहे. सविस्तर तपशील MO821132 या ऍडमिन सेंटरवर लवकरच देण्यात येतील. http://status.cloud.microsoft या वेबसाईटवरही तपशील देण्यात येणार असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई विमानतळ प्राधिकरणाचा,प्रवाश्यांना सल्ला –

  • जागतिक IT आउटेजमुळे निवडक एअरलाइन ऑपरेशन्सवर परिणाम झाला आहे. या काळात, बुकिंग, चेक-इन, बोर्डिंग पास आणि फ्लाइट्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी आणि विलंब कमी करण्यासाठी आम्ही एअरलाइन्सशी सहयोग करत आहोत. अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधा.
  • आपल्या संयमाबद्दल आभार मानतो.
  • जगभरातील एअरलाईन्स, बँक, टेलिकम्युनिकेशन्स सेवेवर परिणाम
  • इतर IT सेवांवरही परिणाम
  • युरोप आणि यूएस, इस्रायल, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत विमानसेवेवर परिणाम
  • बर्लिन विमानतळावर चेक-इन दरम्यान अडचणी अनेक विमानांचं उड्डाण रखडलं
  • एअरलाईन्स तिकीट बुकींग ठप्प
  • लंडन स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्मला फटका
  • यूकेतील रेल्वे सेववर परिणाम
  • ब्रिटनच्या स्काय न्यूज चॅनलचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग बंद
  • अलास्कातील आपत्कालीन फोन सेवा बंद