विनोदी अभिनेता भाऊ कदम प्रचारात, बनसोडे यांच्या पदयात्रेत सहभागी

0
64

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी हास्य कलाकार, अभिनेते भाऊ कदम पिंपरीत आले. आमदार अण्णा बनसोडे हेच पुन्हा बहुमतांनी विजयी होतील, अशी खात्री भाऊ कदम यांनी व्यक्त केली.

महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी मंगळवारी (दि. 12) चिंचवड परिसरातील रामनगर, शंकर नगर, दत्तनगर, विद्यानगर, परशुराम नगर या भागात पदयात्रा काढली. पदयात्रेमध्ये चला हवा येऊ द्या फेम हास्य कलाकार भाऊ कदम यांनी सहभाग घेतला. रामनगर येथील राम मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. सुरुवातीपासून भाऊ कदम पदयात्रेत सहभागी झाले. संपूर्ण परिसरात त्यांनी उपस्थिती लावली.

यावेळी माजी महापौर दिनकर दातीर, मंगला कदम, वैशाली काळभोर, राजू दुर्गे, नारायण बहिरवडे, सुप्रिया चांदगुडे, दिपाली कारंजकर, प्रेमा दातीर, जयश्री दातीर, भारती मोहिते, साधना दातीर, ज्योती दातीर, दिलीप दातीर, राजेश वाबळे, गणेश लंगोटे, सय्यद पटेल, राहुल दातीर, गजराबाई मोरे, गेंदाबाई कांबळे, सत्यविजा कांबळे आणि महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाऊ कदम म्हणाले, आमदार अण्णा बनसोडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील. पिंपरीतील मतदारांनी अण्णा बनसोडे यांना विजयी करून राज्यामध्ये महायुतीची ताकद वाढवावी असे आवाहन देखील भाऊ कदम यांनी केले.
अण्णा बनसोडे यांना चांगला प्रतीसद मिळत आहे. अजित पवार म्हणतात, ‘आम्ही विचारांचे वारकरी वाहतो विकासाची पालखी’, त्यामुळे जनतेला अजित पवार यांच्या कामाची पद्धत चांगल्या प्रकारे माहिती आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार. अजित पवारांनी चांगले काम केले आहे त्यामुळे चांगले काम करणारे उमेदवार मुख्यमंत्री झाले तर केव्हाही चांगले असेही भाऊ कदम म्हणाले.