विनेश फोगाटने कुस्ती सोडली

0
84

8 ऑगस्ट (पीसीबी) – अंतिम फेरीत धडक मारण्यात अपयशी ठरलेली भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्ती मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विनेश फोगाट हीच वजन १०० ग्रॅमने वाढल्याने तिला ऑलिम्पिक मधून बाद करण्यात आलं. संपूर्ण देशातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाल्याचं बघायला मिळालं. एक भावनिक पोस्ट लिहून तिने कुस्तीला अलविदा केलं आहे.विनेशने आपल्या पोस्ट मध्ये लिहिलंय, आई कुस्ती जिंकली, मी हरले, माफ कर! तुझं स्वप्न आणि माझी हिंमत संपली. आता लढण्याची ताकद उरली नाही. अलविदा कुस्ती २००१ -२०२४. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन.

विनेश फोगाट गोल्ड जिंकणार ही खात्री जवळपास प्रत्येक भारतीयाला होती. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण, १०० ग्रॅम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्ण पदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. मैदानात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली.