नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या विनीत जिंदाल या वकिलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. विनीत जिंदाल यांनी मीडियाशी बोलताना दावा केलाय की, मी जेव्हा माझ्या घरी पोहोचला, तेव्हा गेटच्या आतमध्ये एक पॅम्प्लेट टाकलेलं मला दिसलं. त्या पॅम्प्लेटमध्ये (पत्र) अल्लाहचा संदेश.. ‘विनीत जिंदल तेरा भी सर तन से जुदा करेंगे जल्द’, अशी धमकी देण्यात आलीय.
धमकीचं पत्र मिळाल्यानंतर वकील जिंदाल यांनी 100 क्रमांकावर कॉल केला. यासोबतच जिंदालनं धमकीचं पत्रक ट्विट केलं असून, ‘आज जिहादींनी माझं शरीर धडावेगळं करण्याची धमकी दिलीय. घरात सीसीटीव्ही लावले आहेत, पण पत्र टाकणारा सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालेला नाहीय.’
जिंदाल पुढं म्हणाले, काल जेव्हा मी माझ्या घरी आलो, तेव्हा मला माझ्या घराच्या आवारात जीवे मारण्याचं धमकी देणारं पत्र सापडलं. यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला. पत्रात, अल्लाहचा संदेश.. ‘विनीत जिंदल तेरा भी सर तन से जुदा करेंगे जल्द’ (विनीत जिंदालचा लवकरच शिरच्छेद करण्यात येईल), अशी धमकी दिलीय. मी अजमेर शरीफ दर्गाह चिश्ती विरोधात तक्रार दाखल केलीय, असंही ते म्हणाले. सध्या दिल्ली पोलिसांचा (Delhi Police) एक पीएसओ विनीत जिंदाल यांच्या संरक्षणात तैनात आहे.